‘म्यूजियम ऑफ केअर’

‘म्यूजियम ऑफ केअर’ हे एक संग्रहालय आहे ज्याच्या जगभरात अनेक खोल्या आहेत. कोणत्याही संग्रहालयाप्रमाणे यापैकी काही खोल्या इतरांपेक्षा अधिक कायम असतील. नवीन खोल्या उघडल्या जातील, काही खोल्यांचे कार्य बदलतील आणि काही खोल्या बेबंद किव्हा बंद होऊन जातील.

काही खोल्या वाचनासाठी उघडल्या जातील. काही नृत्यासाठी उघडल्या जातील. सुतारकाम करणे, भाज्या उगवणे, विज्ञान करणे, या साठी पण खोल्या असतील. आणि काही खोल्या “मनात येईल ते” करण्यासाठी पण असतील.

म्यूजियम ऑफ केअर मध्ये कोणीही खोली उघडू शकतो. आपल्याला फक्त कोणत्या प्रकारची खोली उघडायची आहे, हे आपण आम्हाला प्रस्तावित करायचे आहे. तसेच, संग्रहालयाच्या खोल्यांमध्ये कोणीही राहू शकतं. आपल्याला फक्त तेथे काय करायचे आहे हे आम्हाला सांगायचे आहे.

म्यूजियम ऑफ केअरचे मुख्य उद्देश सामाजिक संबंध निर्माण करणे आणि राखणे हे आहे. या संबंधांमध्ये वस्तू असू शकतात, पण आम्हाला कलाकृतींचा कॅटलॉग किव्हा संग्रह करण्यात रस नाही. म्यूजियम ऑफ केअर मध्ये कोणतेही गार्ड नाहीत.

म्यूजियम ऑफ केअर मध्ये राहण्यासाठी आपण कलाकारच असले पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही. पैशांची गरज नाही. हे संग्रहालय अशा लोकांसाठी उघडले आहे ज्यांचे सराव ‘काळजीचे संबंध’ यांचे संगोपन करून आपल्या सामूहिक स्वातंत्र्यास वृद्धिंगत करतात – हे काळजीचे संबंध लोक आणि प्राण्यांसाठी असो किव्हा वस्तू आणि पर्यावरणासाठी.

म्यूजियम ऑफ केअरच्या खोल्यांचं ‘क्युरेशन’ त्यांच्यातले राहणारे करतील. या खोल्यांमध्ये कायमस्वरूपी संग्रह किव्हा राहणारे नसल्यामुळे त्या सतत नवीन तयार केल्या जातील. म्यूजियम ऑफ केअर अशा प्रतिकृतीयोग्य सामूहिक पद्धतींच्या विकासास उत्तेजन देईल जे वेगवेगळ्या खोल्यांमध्येच नव्हे तर जगभरात पसरू शकते.

अलेक्झांडर बोगदानोव्हच्या ‘प्रोलेतकुल्ट’ सारखेच, ‘संग्रहालय’ किंवा ‘कलाकार’ काय असू शकतात यावर पुनर्विचार करणे, आणि स्मारकांऐवजी सामूहिक स्वातंत्र्य आणि काळजीसाठी जागा निर्माण करणे, हे म्यूजियम ऑफ केअरमागचे हेतू आहेत. म्यूजियम ऑफ केअरमध्ये ‘कला’ ही प्रतीकात्मक किंवा कलात्मक उत्कृष्ट नमुने यांची निर्मिती करणे नव्हे तर उत्तम जग निर्माण करण्याची प्रथा आहे. 

आपण स्मारक आणि उत्कृष्ट नमुन्यांकडे जितके लक्ष आणि काळजी ठेवतो, तितकेच लक्ष आणि काळजी प्रत्येकास कायम पात्र आहे.

यश लाड अनुवादित